भिवंडी :- संपूर्ण जगभरामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच व भिवंडी महानगरपालिकेला महिला दिनाचा विसर पडलेला असतानाच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी असलेली कर्मचारी संघटना लेबर फ्रंट युनियन च्या वतीने आज जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. सदरचा कार्यक्रम पद्मानगर येथील तेलगू हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अरुणा नल्ला यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लेबर फ्रंटचे अध्यक्ष ऍड किरण चन्ने, भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्य्क आयुक्त रवींद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, पत्रकार संजय भोईर, कराटे शिक्षिका माधुरी तारमळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, उपाध्यक्ष विजय जाधव, सुभाष चव्हाण, शाम गणू गायकवाड, खजिनदार अमोल तपासे, सचिव लक्ष्मण गायकवाड, प्रभाग 4 चे अध्यक्ष निलेश जाधव, प्र मुख्य आरोग्य निरीक्षक लिलाधर जाधव, आरोग्य निरीक्षक सचिन वनमाळी, रवींद्र जाधव, गोविंद गंगावणे, सेवक साळवे, मुकेश जाधव, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जानू चव्हाण यांनी केले.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अरुणा नल्ला, सुविधा चव्हाण, सविता धोत्रे, माधुरी तारमळे, यांच्याहस्ते पुष्पहार तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना तारमळे म्हणाल्या कि, आजच्या महिलांनी माता जिजाऊंच्या आदर्श घेऊन वागले पाहिजे. तसेच महिलांनीही कराटे सारखे शिक्षण घेऊन आपले स्वतःचे रक्षण केले पाहिजे, महिलांनी स्वावलंबी बनणे काळाची गरज आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्य्क आयुक्त रवींद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,यांनी शुभेच्छा दिल्या. तर ऍड किरण चन्ने यांनी माता सावित्रीबाई फुले, माता रमाई व ज्या ज्या महिला क्रांतिकारकांनी महिलांना स्वाभिमानी बनण्याकामी अथक प्रयत्न केलेले आहेत अशा सर्वांना अभिवादन करून मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून लेबर फ्रंट युनियनच्या रुखी समाज सेल ची नियुक्ती करून सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक देऊन सन्मानित केले. रुखी सेलचे अध्यक्ष म्हणून नितीन गोविंद चव्हाण यांची तर सरचिटणीस म्हणून धीरज राठोड यांची निवड करण्यात आली.
तर उप-अध्यक्ष म्हणून योगेश नरसी परमार,वसंतशामजी चव्हाण,मनोहर वालजी चव्हाण, कार्याध्यक्ष म्हणून तुळशीदास राठोड, यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रभाग समिती ३ चे अध्यक्ष म्हणून सुरज गायकवाड, उपाध्यक्ष म्हणून विश्वास सुकऱ्या जाधव, संजय सुदाम गायकवाड, सचिव म्हणून सुभाष बुधाजी जाधव यांची निवड करून या सर्वांना नियुक्ती पत्रक देण्यात आली.
उपस्थित सर्व मान्यवरांचा व महिलांचा यथोचित सन्मान करून शेवटी सर्वांचे आभार मानण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सविता धोत्रे, सुरज गायकवाड, व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले


No comments:
Post a Comment