Friday, 9 March 2018

लीलावती हॉस्पिटल में पतंगराव कदम ने ली आखरी सास


मुंबई में निधन

वरिष्ठ कांग्रेसी नेता और भारती विद्यापीठ के संस्थापक पतंगराव कदम की लीलावती हॉस्पिटल निधन हो गया.

वरिष्ठ कांग्रेसी नेता और भारती विद्यापीठ के संस्थापक पतंगराव कदम का लीलावती हॉस्पिटल में निधन हो गया. वह इलाज के लिए हॉस्पिटल में भर्ती थे.  वह 72 वर्ष के थे. पतंगराव ने सामाजिक, शैक्षणिक और राजकीय क्षेत्र में कई उल्लेखनीय कार्य किए हैं. उनके निधन से पार्टी को बड़ा नुकसान हुआ है. वह गुर्दे के रोग से पीड़ित थे. इलाज के लिए उन्हें मुंबई स्थित लीलावती हॉस्पिटल में भर्ती कराया गया था.

गांव में होगा अंतिम संस्कार
कदम को पहले पुणे ले जाया जाएगा फिर उनके पैतृक गांव सोंसल ले जाएगा. सोंसल सांगली जिले में पड़ता है. कुछ दिनों पहले पूर्व कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उनसे मिलने गई थीं.



Thursday, 8 March 2018

लेबर फ्रंट युनियनच्या वतीने जागतिक महिला दिन हर्षोल्हासात साजरा 



भिवंडी :- संपूर्ण जगभरामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच व भिवंडी महानगरपालिकेला महिला दिनाचा विसर पडलेला असतानाच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी असलेली कर्मचारी संघटना लेबर फ्रंट युनियन च्या वतीने आज जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. सदरचा कार्यक्रम पद्मानगर येथील तेलगू हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अरुणा नल्ला यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लेबर फ्रंटचे अध्यक्ष ऍड किरण चन्ने, भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्य्क आयुक्त रवींद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, पत्रकार संजय भोईर, कराटे शिक्षिका माधुरी तारमळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, उपाध्यक्ष विजय जाधव, सुभाष चव्हाण, शाम गणू गायकवाड, खजिनदार अमोल तपासे, सचिव लक्ष्मण गायकवाड, प्रभाग 4 चे अध्यक्ष निलेश जाधव, प्र मुख्य आरोग्य निरीक्षक लिलाधर जाधव, आरोग्य निरीक्षक सचिन वनमाळी, रवींद्र जाधव, गोविंद गंगावणे, सेवक साळवे, मुकेश जाधव, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जानू चव्हाण यांनी केले.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अरुणा नल्ला, सुविधा चव्हाण, सविता धोत्रे, माधुरी तारमळे, यांच्याहस्ते पुष्पहार तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना तारमळे म्हणाल्या कि, आजच्या महिलांनी माता जिजाऊंच्या आदर्श घेऊन वागले पाहिजे. तसेच महिलांनीही कराटे सारखे शिक्षण घेऊन आपले स्वतःचे रक्षण केले पाहिजे, महिलांनी स्वावलंबी बनणे काळाची गरज आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी  भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्य्क आयुक्त रवींद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,यांनी शुभेच्छा दिल्या. तर ऍड किरण चन्ने यांनी माता सावित्रीबाई फुले, माता रमाई व ज्या ज्या महिला क्रांतिकारकांनी महिलांना स्वाभिमानी बनण्याकामी अथक प्रयत्न केलेले आहेत अशा सर्वांना अभिवादन करून मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून लेबर फ्रंट युनियनच्या रुखी समाज सेल ची नियुक्ती करून सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक देऊन सन्मानित केले. रुखी सेलचे अध्यक्ष म्हणून नितीन गोविंद चव्हाण यांची तर सरचिटणीस म्हणून धीरज राठोड यांची निवड करण्यात आली.
तर  उप-अध्यक्ष म्हणून योगेश नरसी परमार,वसंतशामजी चव्हाण,मनोहर वालजी चव्हाण, कार्याध्यक्ष म्हणून तुळशीदास राठोड, यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रभाग समिती ३ चे अध्यक्ष म्हणून सुरज गायकवाड, उपाध्यक्ष म्हणून विश्वास सुकऱ्या जाधव, संजय सुदाम गायकवाड, सचिव म्हणून सुभाष बुधाजी जाधव यांची निवड करून या सर्वांना नियुक्ती पत्रक देण्यात आली.
उपस्थित सर्व मान्यवरांचा व महिलांचा यथोचित सन्मान करून शेवटी सर्वांचे आभार मानण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सविता धोत्रे, सुरज गायकवाड, व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले 

Wednesday, 7 March 2018

शिवसैनिक लपून चोरून उदघाटनाचे नारळ फोडत नाहीत ; बांधकाम सभापतींच्या भाजपला टोला 



नितिन पंडीत/भिवंडी
भिवंडी ( दि . ७ ) शिवसैनिक लपून चोरून उदघाटनाचे नारळ फोडत नाहीत , जे लोक जिल्हा परिषदेत पराभूत झाले आहेत तेच अशा प्रकारे लपून छपून उदघाटनाचे नारळ फोडतात अशी टिका व अप्रत्येक्ष टोला ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी भाजपला लगावला . नुकताच खारबाव गाणे फिरिंगपाडा रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . दरम्यान खारबाव गाणे फिरिंगपाडा या काँक्रीट रस्त्याचे उदघाटन देखील ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांच्या शुभहस्ते पार पडले . 

            भिवंडीतील खारबाव गाणे फिरिंगपाडा या रस्त्यावर सध्या खड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत होता .नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी एमएमआरडीए कडून या रस्त्यासाठी   सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . एमएमआरडीए कडून मंजूर होणारा निधी हा नागरिकांनी शासनाला भरलेल्या कराच्या पैशातून विकास कामांसाठी खर्च केला जातो . मुख्यमंत्री जरी एमएमआरडीएचे अध्यक्ष असले तरी आमदार हे पदसिद्ध सदस्य असतात आणि स्थानिक आंदारांकडून एमएमआरडीएच्या कामांचा पाठपुरावा केला जातो. अशी माहिती देखील बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे यांनी यावेळीस आपल्या भाषणातून दिली . मात्र असे असतांना भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील हे जाणीवपूर्वक जिल्ह्यातील सर्वच कामांचे श्रेय घेतात , खासदारांनी आता तरी मी पणा सोडावा आणि एवढ्या वर्षात नेमकी काय केलं याचा अभ्यास करावा , असा सल्ला देखील सुरेश म्हात्रे यांनी भाजप खासदार कपिल पाटील यांना या कार्यक्रमादरम्यान दिला . 

             विशेष म्हणजे खारबाव गाणे फिरींगपाडा या रस्त्याचे उदघाटन भाजप कार्यर्त्यांनी काही दिवसांपूर्वी घाईघाईने शासकीय यंत्रणेला विचारात न घेता भिवंडी पंचायत समिती सभापतींच्या हस्ते नारळ फोडून केले होते , या घटनेचा समाचार घेत भाजप वाल्यांनी अशाप्रकारे चोरून छुपुन ट्रक भर जरी उदघाटनाचे नारळ फोडले तरी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवली आहे अशी विखारी टीका देखील ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी याप्रसंगी केली .  तर आगामी लोकसभा आणि विधानसभेत देखील भाजप वाल्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे आवाहन देखील याप्रसंगी सुरेश म्हात्रे यांनी भाजपाला दिले आहे .

              दरम्यान खारबाव फाटक रस्ता मार्च महिन्या अखेर पर्यंत मंजूर करून काम केले जाईल असे आश्वासन देखील सुरेश म्हात्रे यांनी दिले. या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक , जिप सदस्या रत्नाताई तांबडे , भिवंडी पंचायत समितीच्या उप सभापती वृषाली विशे, भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता दत्तु गीते , भिवंडी पंस सदस्या प्रगती पाटील , पंस सदस्या नमिता पाटील , पंस सदस्य अंकुश पाटील , खारबाव ग्राम पंचायतीच्या सरपंच मोहना सुधीर पाटील , उपसरपंच मनोज कृष्णा पाटील , सदस्य अशोक पालकर , रमेश तरे, नागेश मुकादम , नितीन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते .